Sunday 26 January 2014

डॉ.आंबेडकर विद्यालयात स्नेहसंमेलन उत्साहात 
जळगांव(जा):
    स्थानिक डॉ. आंबेडकर विद्यालयात दि २४ जाने रोजी स्नेह संमेलन उत्साहात पार पडले. या प्रसंगी संस्थेचे जनरल सेक्रेटरी - एस वाय खिरोडकर, सचिव- शामभाउ शिरसोले, गोपाल राउत, ठाणेदार एम एस भोगे साहेब , मुख्याध्यापक व्ही टि भारसाकळे तसेच पर्यवेक्षक पी पी भागवत आदि मान्यवरांनी क्रान्तिज्योति सावित्रिबाई फ़ुले यांच्या प्रतिमेचे पुजन करुन कार्यक्रमाचे उद्घाटन केले.                
      प्रास्ताविकात विविध कलागुणांचे महत्व विशद करतांना विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी अशा सांस्क्रुतिक कार्यक्रमांची नितांत गरज आहे असे मुख्यध्यापक  व्ही टी भारसाकळे सर यांनी प्रतिपदित केले. संस्थेचे जनरल सेक्रेटरी एस वाय खिरोडकर यांनी विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासामध्ये सांस्क्रुतिक कार्यक्रमांचे महत्व असते असे मोलाचे मार्गदर्शन केले. ठाणेदार एम एस भोगे साहेब यांनी अशा कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये विविध कौशल्ये विकसित होण्यास मदत होते असे विचार व्यक्त केले.      

       या प्रसंगी विद्यार्थ्यांनी विविध सांस्क्रुतिक कार्यक्रम सादर केले. यामध्ये न्रुत्य, नाट्य, समुहगान, देशभक्तीपर गीत, सामाजीक प्रबोधन इत्यादि कलागुणांचा समावेश होता.                           कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एन व्ही भागवत, एस ए वाघ, के आर पवार, एम बी पवार, एन व्ही वानखडे, एस पी तिजारे, एस के पाचपांडे, टी एम पाचपोर, व्ही यु सोळंके, व्ही एन गायगोल, डी पी कोकाटे, एस आर निकस, सौ आर पी आमले, व्ही के काळपांडे, बी आर गाठे, इ ए साबळे, आर बी उमाळे, श्री हुरपडे सर, कु.पी बी भारसाकळे, कु.एम एम डाबेराव, कु,ए पी अंबड्कार, कु,यु डी राउत, कु एस व्ही डोंगरे,कु पी एम घोंगटे, राहुल बेरळ,देवराज शिरसोले,प्रशांत खिरोडकर,गजानन अवचार,अरुण चव्हाण, हिरालाल राजपुत व स्वंयसेवकांनी यांनी अथक परिश्रम घेतले. .कार्यक्रमाचे सुत्रसंचालन के ओ इंगळे सर यांनी केले. समारोपीय भाषण डी व्ही इंगळे सर यांनी केले.      




No comments:

Post a Comment